सप्टेंबर २०२४: अल्पारंभ फौंडेशन संचलित अर्थ साक्षरता अभियान @ श्री. तिरुमला रिजेन्सी, दिपाली नगर ! गणेशोत्सव कालावधीमध्ये सार्वजनिक मंडळ / कॉलनी / सोसायटीमध्ये अर्थ साक्षरता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
एप्रिल २०२४: व्यक्तींना त्यांच्या पैशांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वपूर्ण आहे. आर्थिकदृष्ट्या सशक्त समाजाची पायाभरणी करण्यासाठी या क्षेत्रातील ज्ञान अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविणे हा आमचा कार्य आयाम ! या अनुषंगाने "बोलत राहूया" या युट्युब चॅनेलवर फाऊंडेशनचे संस्थापक श्री. रघुवीर अधिकारी यांनी मुलाखत दिली. सोशल मीडियाच्या या माध्यमातून वित्तीय साक्षरते संबंधित महत्वपूर्ण बाबी अनेकांपर्यन्त पोहोचतील अशी आशा आहे. या मुलाखतीची लिंक : पुढीलप्रमाणे Click Here
विद्या प्रबोधिनी प्रशाला नासिक येथील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबर, "विद्यार्थी आणि शिक्षक यांची अर्थ साक्षरता" , असे उद्दिष्ट्य समोर ठेवून, अल्पारंभा फौंडेशनच्या माध्यमातून २०२३-२४ या वर्षभर अनेक सत्रे , उपक्रम राबविली गेली !! वय आणि गरज लक्षात घेऊन जे जे संयुक्तिक ते ते विषय तिथे पोहचविण्यात यश आले !
महिला दिन २०२४ निमित्त, पीएनएस कॉर्पोरेट सर्व्हिसेस येथे काम करणाऱ्या टीमसाठी प्राची देशमुख यांनी सत्र घेतले. यात त्यांनी आर्थिक नियोजनाच्या संकल्पना मांडल्या !!
३ ऑक्टो. २०२३: विद्या प्रबोधिनी प्रशालायेथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, श्री. तन्मय अधिकारी यांनी सत्र घेतले. अभ्यासक्रमातील विषय: "बचत वि गुंतवणूक, शेअर्स म्युच्युअल फंड, ब्रोकरेज आणि कर" याबाबतीत त्यांनी मार्गदर्शन केले.
२७ जुलै २०२३: महिला आधार आश्रम , अशोकस्तंभ येथे , कॉलेज विद्यार्थिनी आणि वर्किंग महिला यांच्यासाठी "अर्थ साक्षरता आणि बचतीची सोपी माध्यमे" या विषयावर प्राची देशमुख आणि रुपाली कुलकर्णी यांनी सत्र घेतले ! प्रश्नोत्तरे ही उत्तम झाली !
८ मार्च २०२३: महिला दिन विषेश : अर्थ साक्षरता व्याख्यान , TeknoCrat Controls Pvt Ltd , Satpur, Nasik येथील महिला अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी संपन्न झाले ! व्याख्यात्या : प्राची देशमुख, डॉ. रुपाली कुलकर्णी िकोन बघून समाधान वाटले !!सहकार्य : प्राची देशमुख, डॉ. रुपाली कुलकर्णी
१० डिसेम्बर २०२२: आनंद निकेतन शाळा, नासिक येथे, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी "आर्थिक नियोजन", हे व्याख्यान घेतले. मुलांनी जे प्रश्न विचारले त्यावरून लक्षात आलेली त्यांची प्रगल्भता खूपच कौतुकास्पद होती. व्याख्यानानंतर झालेल्या वैयक्तिक प्रश्नोत्तरांवरून, विद्यार्थ्यांच्या मनात आर्थिातील करिअर्स कडे / वाणिज्य शाखेकडे बघण्याचा दृष्टिकोन बघून समाधान वाटले !!सहकार्य : प्राची देशमुख, आनंद निकेतन शाळेच्या शोभनाताई भिडे !!
२५-२६ नोव्हे. २०२२: "आर्थिक साक्षरतेकडून, आर्थिक सुरक्षिततेकडे ", याविषयावर , टीम अल्पारंभातील प्राची देशमुख यांनी क. का. वाघ. महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
२३ सप्टेंबर २०२२: अल्पारंभा फाऊंडेशन आणि आयाम, नाशिक यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात डॉ.श्री.विनायकराव गोविलकर यांनी आपल्या ओघवत्या विवेचनातून "श्रीसुक्ताचे" अनेकविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. धनवान आणि ‘श्री’मंत यातला नेमका फरक, ‘अलक्ष्मी’ म्हणजे नेमकी कशी लक्ष्मी, तसेच काय वर्तनाने ही ‘भाग्यकारक लक्ष्मी’ होईल, तिचे अर्जन कसे अपेक्षित आहे, तिचे संवर्धन कसे असायला हवे, इ बद्दल डॉ. विनायक गोविलकर यांनी अत्यंत प्रत्ययकारी विवेचन केले.
७ सप्टेंबर २०२२: रोथे एरडे , गोंदे , इगतपुरी येथे "अर्थ साक्षरता " विषयावर श्री. रघुवीर अधिकारी आणि श्री. उपेंद्र वाघ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. विविध सरकारी पंतप्रधान विमा योजना, आर्थिक पिरॅमिड, आथिर्क नियोजन आणि बजेट प्लॅनिंग यावर मार्गदर्शन करण्यात आले.
१९ ऑगस्ट २०२२: सातपुडा इंजि. प्रा. ली. येथे उपस्थितांना श्री. संदीप देशमुख यांनी संबोधित केले. विविध ग्रुप ग्रॅच्युइटी पॉलिसी, पंतप्रधान विमा योजना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
९ फेब २०२१: डॉ. रुपाली कुलकर्णी यांनी , KBT महाविद्यालय येथे , "अर्थ साक्षरतेचे महत्व" या विषयावर , MBA च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
"आर्थिक साक्षरता क्लब" च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना "आर्थिक सल्ला, व्यवसाय वाटा" या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येते.
संस्थेतर्फे, 'आर्थिक साक्षरता' विषय घेऊन परिसंवादाचे आयोजन करण्यात येते. विविध सामाजिक संस्थांमध्येही असे परिसंवाद आयोजित करण्यात येतात.