नमस्कार !
महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये जी दिव्यांग मुले शिक्षण घेत आहेत, जेथे अपुऱ्या शैक्षणिक सुविधांच्या अभावे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात अडचणी आहेत, तेथे अप्लारंभा फौंडेशनद्वारे मदतीचा हात पुढे केला जातो आहे. याद्वारे आजपर्यत अनेक संस्थांसाठी मदत कार्य उभे राहिले आहे. यामध्ये..
१) कर्णबधीर विद्यार्थ्यांना, शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात आणणारी संस्था : श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय , नासिक २) विशेष मुलींच्या प्रगतीसाठी समर्पित संस्था : घरकुल परिवार संस्था ३) अंध बंधू-भगिनींच्या विकासासाठी कार्यरत : नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड्स अर्थात NAB, सातपूर तसेच विवेकानंद केंद्र आश्रमशाळा पिंपळद, वयोवृद्ध रुग्णांना आपलेसे करणारी संस्था : दिलासा, ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण, जीवनस्तर मिळावा यासाठी समर्पित संस्था:पूर्वांचल सेवा समिती, समतोल जीवशैलीसाठी ध्यान साधना पुरस्कृत करणारे नासिक विपश्यना केंद्र आदी अनेक संस्थांचा उल्लेख करता येईल.
नाशिकमधील, एका मराठी माध्यमाच्या शाळेतील, आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांचे निवास ते शाळा अशी वाहतुकीची व्यवस्था करणे. उपक्रमासाठी अंदाजे खर्च ₹१६ लाख प्रति वर्ष असा आहे. अल्पारंभा अंतर्गत या उपक्रमासाठी निधी संकलनाचे कार्य चालू आहे. तुमचे योगदान ( ₹५०१ पासून पुढे असणारे ) कलम ८० G अंतर्गत प्राप्तिकर लाभांसाठी पात्र आहे. तुमची ही आर्थिक मदत या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक पाठिंबा देण्याबरोबरच पुढील उद्दिष्टये साध्य करेल.
१) विद्यार्थ्याना शाळेत येण्यासाठी सुविधा, प्रोत्साहन
२) विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय
३) दैनंदिन शालेय प्रवासासाठी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण
४) वायू प्रदूषण कमी करणारी एकत्रित वाहतूक सेवा
वर आधी नमूद केलेल्या संस्थांच्या दिव्यांग मुलांच्या शिक्षणाची प्रगती सुकर व्हावी म्हणून अल्पारंभा माध्यमातून , त्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी तसेच दैनंदिन जीवन सुरळीत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासाठी, निधी उभा करण्याचे कार्य सुरु आहे.
आपणही या कार्यात योगदान देऊ इच्छित असल्यास संपर्क साधावा : alparambha@gmail.com, 9011896681