देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३% आहे. ही देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडसर ठरणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच सामाजिक अर्थ साक्षरता वृद्धिंगत व्हावी, यासाठी अल्पारंभा द्वारे सतत विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये "अर्थ साक्षरता क्लब" ची स्थापना करणे, आर्थिक साक्षरता विषयावर मार्गदर्शनपर सत्रे, उपक्रम घेणे, अर्थ साक्षरतेवर आधारित साहित्य प्रसिद्ध करणे (ब्लू बूक, मनोमनी,गवाक्ष) आणि प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून, आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक, साक्षर असणाऱ्या पिढीचे निर्माणकार्य सुरु आहे. "आर्थिक साक्षरता क्लब" च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना "आर्थिक सल्ला, व्यवसाय वाटा" या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येते.या अंतर्गत, महाराष्ट्रात १५+ महाविद्यालयांमध्ये आर्थिक साक्षरता क्लबची सुरुवात झालेली आहे.
Click इंग्रजी व्हिडिओ Why To have a Inhouse Financial Literacy Club at My Organization?
Click मराठी व्हिडिओ माझ्या संस्थेत "आर्थिक साक्षरता क्लब" गरजेचा का आहे ?
Click :आर्थिक साक्षरता विषयावर घेतलेली सत्रे
आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार: नासिक शहर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये, "आर्थिक साक्षरता क्लब / परिसंवाद " यांचे आयोजन करणे आणि त्याद्वारे तेथील विद्यार्थी / अधिकारी / कामगार वर्गाचे याविषया अंतर्गत प्रबोधन करणे.
यामध्ये पुढील विषयां अंतर्गत सत्रे घेतली जातात .
आर्थिक साक्षरता सत्रांचे विषय
आपली आर्थिक साक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी/ पडताळण्यासाठी पुढील चेकलिस्ट देत आहे. ती स्वतःसाठी पडताळून पहा आणि त्यातील संदर्भांची माहिती करून घ्या!
करा विचार, करा अंमल ! जागवा स्वतःचे, समाजाचे, देशाचे अर्थभान !!
फौंडेशनच्या आर्थिक साक्षरता अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हीही पुढीलप्रमाणे योगदान देऊ शकता: तुमच्या कार्यालयात/महाविद्यलयात/ शाळेत/ परिसरात विविध उपक्रम चालविणारा "अर्थ साक्षरता क्लब " याची स्थापना / "आर्थिक साक्षरता" या विषयावर व्याख्यान/परिसंवाद यांचे आयोजन करणे.
अधिक माहिती: डॉ. रुपाली कुलकर्णी, ९०११८९६६८१ / alparambha@gmail.com
IPS अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस दलातील उच्चधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील, यांचा 'सायबर गुन्हेगारी आणि बचाव' या संदर्भातील माहितीपूर्ण विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
क्षणचित्रे
>