ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

अर्थ साक्षरता अभियान

देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३% आहे. ही देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडसर ठरणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच सामाजिक अर्थ साक्षरता वृद्धिंगत व्हावी, यासाठी अल्पारंभा द्वारे सतत विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये "अर्थ साक्षरता क्लब" ची स्थापना करणे, आर्थिक साक्षरता विषयावर मार्गदर्शनपर सत्रे, उपक्रम घेणे, ब्लू बूक, मनोमनी,गवाक्ष आदी साहित्य निर्मिती आणि प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये "आर्थिक साक्षरता क्लब" ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण करणेसाठी व्याख्याने, माहितीपट, प्रशमंजुषा, क्षेत्रभेटी आदी उपक्रमांचे आयोजन होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक, साक्षर असणाऱ्या पिढीचे निर्माणकार्य सुरु आहे.

संस्थेच्या माध्यमातून सुरु झालेले अर्थ साक्षरता क्लब : नासिक : के. के . वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, के. बी.टी अभियांत्रिकी महाविद्यालय, जे.डी.सी. बिटको महाविद्यालय, गोबल व्हिजन शाळा, पुणे:ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई : विद्यालंकार संस्था, नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वर्धा: जी. एस. . कॉमर्स महाविद्यालय, धुळे : झेड. बी. पाटील महाविद्यालय इ.

Click :आर्थिक साक्षरता विषयावर घेतलेली सत्रे

Click इंग्रजी व्हिडिओ   Why To have a Inhouse Financial Literacy Club at My Organization?

Click मराठी व्हिडिओ    माझ्या संस्थेत "आर्थिक साक्षरता क्लब" गरजेचा का आहे ?

सध्या सुरु असणारे उपक्रम


  • आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार: नासिक शहर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये, "आर्थिक साक्षरता क्लब / परिसंवाद " यांचे आयोजन करणे आणि त्याद्वारे तेथील विद्यार्थी / अधिकारी / कामगार वर्गाचे याविषया अंतर्गत प्रबोधन करणे.

"आर्थिक साक्षरता क्लब" च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना "आर्थिक सल्ला, व्यवसाय वाटा" या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येते.

महाराष्ट्रात, विविध १३ शैक्षणिक संस्थांमध्ये, विद्यार्थ्यांच्या आर्थिक शिक्षणासाठी "आर्थिक साक्षरता क्लब" ची स्थापना करण्यात आलेली आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आर्थिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते.

>