ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

गॅलरी

गॅलरी

अल्पारंभाच्या माध्यमातून, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी निर्मिलेल्या 'ब्लु बूक' ची माहिती, अनेकविध ठिकाणी परिसंवादाच्या माधनयमातून दिली जात आहे. कुटुंबाच्या आर्थिक प्रवासात, महिलांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, स्वतःला आणि पर्यायाने कुटुंबाला आर्थिकरित्या साक्षर करावे या ध्येयाला समोर ठेवून टीम कार्यरत आहे.

महाराष्ट्रात, विविध १३ शैक्षणिक संस्थांमध्ये, विद्यार्थ्यांच्या आर्थिक शिक्षणासाठी "आर्थिक साक्षरता क्लब" ची स्थापना करण्यात आलेली आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आर्थिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते.

>

"आर्थिक साक्षरता क्लब" च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना "आर्थिक सल्ला, व्यवसाय वाटा" या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येते.

नाशिक शहरात आयोजित होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 'आर्थिक साक्षरता' विषय घेऊन उपस्थितांचे प्रबोधन केले जाते. विविध प्रधानमंत्री योजना, सर्वसामावेशक सरकारी योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे 'आर्थिक साक्षरता दूत' कार्य करतात. याद्वारे अनेकांनी सरकारी योजनांचा लाभ घेतलेला आहे.

वाचनाचे महत्व मुलामध्ये रुजावे यास्तव, किशोरांचे लाडके मासिक "वयम" या मासिकाचे प्रसार-कार्य सुरु आहे. अशाच एका प्रसंगी, डॉ. आनंद नाडकर्णी, यांच्यासमवेत टीमचे सदस्य.

पिंपळगाव बाहुला, नासिकस्थित घरकुल परिवार संस्था मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुली / स्त्रियांसाठी (खासकरुन ज्यांच्या पालकांना या सुविधा उपलब्ध करुन देण्यात अक्षम आहेत) त्यांना सुरक्षित घर उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापना केली गेली आहे. सौ. विद्याताई फडके यांच्या मार्गदर्शनाखाली, या विशेष मुलींच्या पुनर्वसनासाठी संस्था काम करते. संस्थे र्फे, घरकुल येथील मुलींच्या सहाय्य्यतेसाठी निधी उभारण्यात येतो. दिवाळी, गणेशोत्सव काळात या मुलीने तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठीही संस्थेतर्फे सहाय्य्य करण्यात येते. आर्थिक मदतीचा धनादेश स्वीकारतांना सौ. विद्याताई फडके.

नासिक येथील श्रीमती माई लेले श्रावण विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र उपलब्ध व्हावे यासाठी टीम संस्थेतर्फे, समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने रु. १५ लाख इतका निधी उभारण्यात आला आहे. त्याचा धनादेश स्वीकारतांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वृषाली घारपुरे. अल्पारंभाच्या माध्यमातून या संस्थेच्या अनेक होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना भविष्यातही अशा स्वरूपाची मदत उपलब्ध व्हावी म्हणून संस्था प्रयत्नशील आहे.

'आर्थिक साक्षरता' विषय घेऊन ज्येष्ठ मनोविकास तज्ञ् डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या सहकार्याने, 'Money चे अंतरंग' नामक मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले. 'पॆसा आणि मानवी व्यवहार' यावर भाष्य करताना डॉ. नाडकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

संस्थेतर्फे, 'आर्थिक साक्षरता' विषय घेऊन परिसंवादाचे आयोजन करण्यात येते. विविध सामाजिक संस्थांमध्येही असे परिसंवाद आयोजित करण्यात येतात.

२०१८ मधील केरळ येथील पूरग्रस्तांसाठी तसेच ऑगस्ट २०१९ मध्ये सांगली-कोल्हापूर येथे उद्भवलेल्या भीषण पूर परिस्तितीशी सामना करणाऱ्या नागरिकांसाठी टीम संस्थेतर्फे आर्थिक मदत पाठविण्यात आली. तसेच घटनास्थळी मदकार्यात सहभाग नोंदविण्यात आला.

आदिताल तबला अकादमी आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये 'तबला चिल्ला..अखंड नादसंकीर्तन’ ही संकल्पना सुरू झाली नाशिकमधील तबला चिल्ला ही साधना म्हणजे राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील साधकांसाठीही एक तालपर्वणीच असते.थिरकवाँ खाँसाहेबांच्या स्मृतिनिमित्त जरी हा कार्यक्रम हाेत असला तरी संपूर्ण भारतातील तबल्याचा एक ‘फ्लेवर’ या ठिकाणी ऐकायला आणि बघायला मिळताे. बनारस, दिल्ली, अजमेर, भाेपाळ, इंदूर येथील तबलासाधनेचं आदानप्रदान यानिमित्ताने होते.

नाशिक महानगरातील संगीत क्षेत्रात संगीताचा प्रसार आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या ‘पवार तबला अकादमी’ या संस्थेस वर्ष २०२० मध्ये यंदा ५० वर्षे पूर्ण झाली तसेच नाशिकमधील संगीत आणि सामाजिक संस्थांना नेहमीच मदत करणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या एस.डब्ल्यू.एस. फायनान्शीयल सोल्युशन प्रा. लि. या संस्थेलाही या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या दोन्ही संस्थांच्या वतीने नाशिककरांसाठी वर्षभर (दर तीन महिन्यांनी तीन दिवस याप्रमाणे) ‘तालाभिषेक’ या संगीत महोत्सवाचे आयोजन केले गेले. या महोत्सवाचे पहिले पुष्प फेब्रुवारी, दुसरे पुष्प मे महिन्यात, तिसरे पुष्प सप्टेंबर आणि समारोपाचे पुष्प डिसेंबर २०१९ मध्ये संपन्न झाले. यातील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे:

मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या उपक्रमांमध्येही संस्था उत्फुर्त प्रतिसाद देते आणि सहभागी होते. 'ग्रंथदिंडी' मध्ये सहभागी टीम.

बालदोस्तांसाठी विविध उपक्रम संस्थेमार्फत नियमितपणे घेतले जातात. यात 'मुक्तरंग' हे हस्तकला शिबीर, 'वयम वाचक कट्टा' हा वाचनाची आवड रुजविण्यासाठी उपक्रम तसेच 'बायोस्कोप' हा बालचित्रपटांचा खजिना उलगडणारा उप्रक्रम यांचा समावेश असतो.

वनबंधू परिषद संचलित 'एकल विद्यालय' या प्रकल्पासाठी निधी संकलनाचे कार्य केले जाते. ग्रामीण व आदिवासीं भागातील बंधू भंगिनींना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण, आरोग्य सेवा देण्यासाठी, संपूर्ण भारतात 34 अध्यायांचे विस्तृत जाळे वनबंधू परिषदेने उभे केलेले आहे.

नासिक येथील जनकल्याण रक्तपेढी बरोबरही संस्थेचे असेच सामाजिक ऋणानुबंध जोडले गेलेले आहेत. संस्थेतर्फे वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच प्लेटलेट्स डोनरही संस्थेच्या माध्यमातून रक्तपेढी बरोबर जोडले गेलेले आहे. जनकल्याण रक्तपेढी द्वारे, अनेकदा या सत्कार्यासाठी संस्थेचा सत्कार करण्यात आलेला आहे.