नमस्कार !
आपले कुटुंब आपल्यासाठी नेहमीच सर्वात महत्वाचे आणि प्रिय असते. “कुटूंब” ही संकल्पनाच अशी आहे की जी कर्त्या व्यक्तीस, कुटुंबासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असते जेणेकरून कुटुंबातील प्रत्येक सदस्य, त्याचे भावी आयुष्य अधिक समृद्धरित्या जगू शकेल.
असे असूनसुद्धा कुटुंबाशीच निगडीत असणारी एक लहानशी आणि बहुतांश कुटुंबप्रमुखांकडून नेहेमीच दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट म्हणजे, आपल्या संपत्ती आणि मालमत्तेबाबत अचूक आणि अद्ययावत अशा नोंदी ठेवणे !! कुटुंबाशी निगडीत असणाऱ्या आर्थिक बाबींचे असे रेकॉर्डिंग क्वचितच योग्यरित्या केले जाते किंबहुना ही बाब अनावश्यक मानली जाते. आपल्या मालमत्तेचा, भविष्यातील कोणताही अनिश्चित क्षय रोखण्यासाठी, आपण कुटुंबासाठी केलेले आर्थिक नियोजन फलद्रुप होण्यासाठी, असे नोंदणीकरण आवश्यक असते. कुटुंबाच्या उत्पनाचा स्रोत असणाऱ्या व्यक्तीबाबत काही अकाली, दुर्दैवी घटना घडली तर आर्थिक बाबींबाबत असणाऱ्या अनागोंदींमुळे कुटुंबातील सदस्यांवर / उत्तराधिकारीवर अमाप मानसिक दडपण येऊ शकते आणि कुटुंबप्रमुखाने केलेले आर्थिक नियोजन कोलमडू शकते. असे अनेक प्रसंग आपण आजूबाजूस घडताना बघतो.
म्हणूनच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने, आर्थिकदृष्टया सजग, साक्षर व्हावे यासाठी आम्ही "ब्लू बूक" निर्मिले आहे. ब्लू बुक ही एक सोपी, सुलभ संकल्पना आहे जिचा वापर कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या सर्व आर्थिक बाबींचे नोंदनीकरण करण्यासाठी करायचा आहे. असे केल्याने एखाद्या कुटुंबाची वास्तविक, आर्थिक परिस्थिती, घरातील सर्व सदस्यांना स्पष्ट होण्यास मदत होते तसेच कुटूंबाशी संबंधित भविष्यातील कोणत्याही आर्थिक निर्णयासाठी मार्गदर्शक म्हणूनही ब्लू बूक कार्य करते. ब्लू किंवा निळा रंग हा स्थिरतेशी संबंधित आहे. हा रंग विश्वास, निष्ठा, आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि सत्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच या आर्थिक संकल्पनेचे नामकरण आम्ही “ब्लू बुक” असे केले आहे. ब्लू बुक वापरण्यामागील उद्देश्य कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिकबाबींबाबत साक्षर, जागरूक करणे आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रवासात त्यांनाही समाविष्ट करून घेणे असा आहे.
प्रत्येकाने जीवनातील भावी अनिश्चिततेसाठी तयार असले पाहिजे आणि आपल्या प्रियजनांना त्यासाठी मदतही केली पाहिजे. आणि म्हणूनच "ब्लू बुक" चा वापर तुम्ही नक्की प्रभावीपणे करावा !! त्यासाठी शुभेच्छा !!
Click व्हिडिओ :ब्लु-बूक संकल्पना
आपली ब्लु-बूक ची प्रत मिळविण्यासाठी संपर्क: alparambha@gmail.com, 9011896681
अल्पारंभाच्या माध्यमातून, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी निर्मिलेल्या 'ब्लू बुक' ची माहिती, अनेकविध ठिकाणी परिसंवादाच्या माधनयमातून दिली जात आहे. कुटुंबाच्या आर्थिक प्रवासात, महिलांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, स्वतःला आणि पर्यायाने कुटुंबाला आर्थिकरित्या साक्षर करावे या ध्येयाला समोर ठेवून टीम SWS कार्यरत आहे.