ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

गॅलरी

आढावा..मागील काही उपक्रमांचा

ऑक्टोबर २०२४: श्रवण आरोग्याची काळजी !! श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय येथे ४ दिवसीय श्रवण मूल्यमापन शिबिर आयोजित करण्यात आले. विख्यात संस्था WeHear तर्फे विद्यार्थ्यांच्या श्रवण आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी ऑडिओग्रामसह सर्वसमावेशक श्रवण तपासणीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे त्यांच्या श्रवण क्षमतेत प्रगती होणे अपेक्षित आहे.

सप्टेंबर २०२४: अल्पारंभ फौंडेशन हे, प्लॅस्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीचा मुकाबला करण्यासाठी 'कापडी पिशवी प्रकल्प' यावर काम करत असलेल्या 'खारीचा वाटा' टीमसाठी फन्डिंग पार्टनर म्हणून काम करत आहे ! पहिल्या प्रयत्नात बाजारातून ५००० प्लास्टिक बॅग्स चे निर्मूलनासाठी काम केले जात आहे . शालेय विद्यार्यांच्या मदतीने या सामाजिक प्रश्नावर काम करतांना, कापडी पिशवीच्या वापरासाठी भाजी विक्रेते आणि ग्राहक यांचेही प्रबोधन केले जात आहे.

जुलै २०२४:भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ श्री.दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्या स्मृतिदिनाचे ( ४ जुलै) औचित्य साधून, अल्पारंभा फाउंडेशन, नाशिक तर्फे विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सी.एच.एम ई. सोसायटीच्या विद्याप्रबोधिनी शाळेत इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी, "कापरेकर स्पर्धा परिक्षा" या उपक्रमाचे आजोजन करण्यात होते. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची भीती कमी व्हावी व या विषयाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांची तार्किक व बौद्धिक क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मार्च २०२४ : अल्पारंभा फौंडेशन आणि डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज यांचे दरम्यान "करिअर क्राफ्ट: स्किल एन्हांसमेंट" हा सामंजस्य करारावर करण्यात आला. या अंतर्गत व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले. उद्घाटन सत्र, कु. साक्षी देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी "मुलाखत तंत्र" या विषयावर घेतले.

मार्च २०२४ : आपल्या अंगभूत कौशल्यांना वाव देण्यासाठी, अनेक आव्हानांचा सामना करत, अथक मेहनत घेणाऱ्या अशा या गुणी खेळाडू तसेच सामाजिक, पर्यावरण संवर्धन , आर्थिक साक्षरता आणि कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार , १ मार्च २०२४ रोजी, एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच "शार्क टॅंक" फेम राधिका गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.

डिसेम्बर २०२३: आपल्या "शैक्षणिक आयमाच्या" अंतर्गत अल्पारंभा फौंडेशन मार्फत ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यात आली. संगणक कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी मराठी माध्यमातून ऑनलाईन कोर्स MS Excel Essentials तसेच ऍडवान्सड MS Excel, MS Excel मधील Financial Formulae हे ऑनलाइन कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत.

ऑक्टोबर २०२३: "सामाजिक मानसिक आरोग्य" सुधारण्यासाठी अल्पारंभा फौंडेशन तर्फे योगदान देण्यास सुरुवात झाली. "मानसिक आरोग्यासाठी सेल्फ थेरपी" या विषयावरील दुसरे सत्र मेंटल हेल्थ कोच आणि इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट कु. साक्षी देशमुख यांनी घेतले ! १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. आपल्या भोवतालाला शांततापूर्ण स्थान बनवण्याच्या दिशेने आमचे हे छोटेसे योगदान आहे !!

१५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय नासिक येथे , अल्पारंभा फौंडेशनच्या माध्यमातून ५ गरजू विद्यार्थ्यांना हिअरिंग एड्स देण्यात आले. वर्ष २०१६- १७ पासून ते आजपर्यंत, एकुण ७० मुलांना हिअरिंग एड्स देण्यात आले आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खारीचा वाटा उचलणाऱ्या सर्व मदतकर्त्यांचे आभार !

ऑगस्ट २०२२: आजादीका अमृत महोत्सव' या निमित्ताने नाशिक येथील चार शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी , "शुरा मी वंदीले" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध, आकाशवाणी निवेदिका व सामाजिक व्याख्यात्या " अनघाताई मोडक" मुंबई, यांनी स्वातंत्र्य सेनानींच्या गौरवार्थ व्याख्यान दिले !