ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

गॅलरी

आढावा..मागील काही उपक्रमांचा

ऑक्टोबर २०२४: भारतीय संगीतकार, गायक, पद्मभूषण स्व. जगजीत सिंग यांचा १० ऑक्टोबर हा स्मरणदिवस ! या दिवसाचे औचित्य साधून अल्पारंभ फौंडेशनमार्फत रविवार ५ ऑक्टोबर २०२४ रोजी "शाम ए गझल" या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. धनंजय मनोहर , यांनी आपल्या सहकलाकारांच्या समवेत बहारदार गझल सादरीकरण केले. त्यांना नाशिकचे प्रतिथयश कलाकार श्री. राजेश भालेराव , श्री. रसिक कुलकर्णी, रागेश्री धुमाळ तसेच श्री. ऋषिकेश क्षीरसागर यांनी समर्पक साथसंगत केली. स्व. जगजीत यांनी गायलेल्या तसेच संगीतबद्ध केलेल्या अनेक बहारदार गझलींची प्रस्तुती यावेळी करण्यात आली.

सप्टेंबर २0२४: शनिवार २९ सप्टेंबर रोजी पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित "तालाभिषेक बैठक: ७" , कुसुमाग्रज स्मारक ,विशाखा सभागृहात संपन्न !!

जून २०२४: गुरु पद्मभूषण उस्ताद राशीद खान यांना शिष्यांकडून आदरांजली आणि अभिवादन ! "स्वर सुमनांजली" या दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण !

मे २०२४: पद्मश्री तालयोगी पं. सुरेशदादा तळवलकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा २८ मे २०२४ रोजी गुरुदक्षिणा सभागृह नासिक येथे संपन्न झाला. त्यांचा सत्कार सुपर कॉम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ विजय भटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्री. सत्यजित तळवलकर यांचे एकल तबलावादनही सादर झाले.

फेब्रुवारी २०२४: तबला चिल्ला महोत्सव वर्ष ८ !! आदिताल तबला अकादमीच्या सहकार्याने विद्यमाने नाशिकमध्ये 'तबला चिल्ला..अखंड नादसंकीर्तन’ ही संकल्पना सुरू झाली नाशिकमधील तबला चिल्ला ही साधना म्हणजे राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील साधकांसाठीही एक तालपर्वणीच असते.

फेब्रुवारी २०२४: नाशिक महानगरातील संगीत क्षेत्रात संगीताचा प्रसार आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या ‘पवार तबला अकादमी’च्या सहकार्याने ‘तालाभिषेक’ या संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. जानेवारी 2023 पासून 'तालाभिषेक बैठक' या संगीत मैफिलीचे आयोजन देखील केले जात आहे. दर दोन महिन्यांतून एकदा असे या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.