नमस्कार !
अर्थ साक्षरता दूत: आवश्यकता: आपल्या देशात अर्थ-साक्षरतेचे प्रमाण केवळ २४% इतकेच आहे ! आणि या प्रमाणातील बहुतांश जनसंख्या ही केवळ शहरी भागात, शिक्षित व्यक्तींमध्ये आणि प्रामुख्याने पुरुषांमधील आहे ! तेव्हा १३४ कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात उर्वरित ७६% जनसंख्येपर्यंत , अर्थसाक्षरतेची ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी आवश्यकता आहे हजारो अर्थ साक्षर दूतांची !
अर्थ साक्षरता दूत: कार्य : अल्पारंभाचे अर्थ साक्षरता दूत प्रत्येक व्यक्तीस आवश्यक असणारी मूलभूत आर्थिक साक्षरता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. भारत सरकारद्वारे, सर्व भारतीय नागरिकांसाठी अनेक उपयुक्त आर्थिक योजना वेळोवेळी जाहीर केल्या गेलेलया आहेत. परंतु सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही माहिती किंवा व त्याविषयी जागरूकता आढळून येत नाही. या योजनांची माहिती तसेच बचत, गुंतणवूक, विमा, कर्जे, कर, आर्थिक नियोजन याविषयी जागरूकता आणण्याचे कार्य आर्थिक साक्षरता दूत करत आहेत
आपल्या स्वतः पासून सुरुवात करून आपले कुटुंब कुटुंबाचे निगडीत सेवा देणाऱ्या व्यक्ती तसेच आजूबाजूच्या परिसरात किंवा ग्रामपंचायतींच्या मार्फत खेड्यापाड्यात हे दूत कार्यरत आहेत !अर्थसाक्षरता दूतांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल ची सुविधा उपलब्ध आहे: अर्थसाक्षरता दूत पोर्टल
तुम्हालाही 'अर्थसाक्षरता दूत' म्हणून कार्य करायचे असल्यास कृपया संपर्क साधा: alparambha@gmail.com, 9011896681