डिसेम्बर २०२५: श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय, नाशिक येथे क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वितरण करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला !!
नोव्हेंबर २०२५: टीम अल्पारंभ मधील डॉ. आर. डी. कुलकर्णी यांनी “Cyber Security Threats for Industries” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सत्र घेतले. या सत्रामध्ये त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील वाढते सायबर धोके, डेटा चोरी, हॅकिंगचे प्रकार, फिशिंग/मालवेअर यांसारख्या समस्यांबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच सुरक्षित डिजिटल सवयी आणि संरक्षणाच्या उपाययोजनांवरही मार्गदर्शन केले.
नोव्हेंबर २०२५ : आर्थिक साक्षरता क्लब अंतर्गत उपक्रम : विद्या प्रबोधिनी प्रशाला येथे आमच्या ‘Financial Literacy Club’ अंतर्गत श्री. तन्मय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांसाठी “GST (वस्तू व सेवा कर)” या विषयावर अत्यंत माहितीपूर्ण सत्र घेतले.
ऑक्टोबर २०२५: युनिक ट्रीटमेंट्समध्ये Cyber Suraksha! डिजिटल सुरक्षितते संबंधित जागरूकता आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ. रुपाली कुलकर्णी यांनी युनिक ट्रीटमेंट्स या कंपनीमध्ये सायबर सुरक्षा विषयावर जागरूकता सत्र घेतले. विविध सायबर फ्रॉड्स आणि ते टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंबंधी विविध उदाहरणांसह तेथील टीमला माहिती देण्यात आली.