नमस्कार !
महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये जी दिव्यांग मुले शिक्षण घेत आहेत, जेथे अपुऱ्या शैक्षणिक सुविधांच्या अभावे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात अडचणी आहेत, तेथे अल्पारंभा फाऊंडेशनद्वारे मदतीचा हात पुढे केला जातो आहे. याद्वारे आजपर्यत अनेक संस्थांसाठी मदत कार्य उभे राहिले आहे. यामध्ये..
१) कर्णबधीर विद्यार्थ्यांना, शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात आणणारी संस्था : श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय , नासिक २) विशेष मुलींच्या प्रगतीसाठी समर्पित संस्था : घरकुल परिवार संस्था ३) अंध बंधू-भगिनींच्या विकासासाठी कार्यरत : नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड्स अर्थात NAB, सातपूर तसेच विवेकानंद केंद्र आश्रमशाळा पिंपळद, वयोवृद्ध रुग्णांना आपलेसे करणारी संस्था : दिलासा, ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण, जीवनस्तर मिळावा यासाठी समर्पित संस्था:पूर्वांचल सेवा समिती, समतोल जीवशैलीसाठी ध्यान साधना पुरस्कृत करणारे नासिक विपश्यना केंद्र आदी अनेक संस्थांचा उल्लेख करता येईल.
वर आधी नमूद केलेल्या संस्थांच्या दिव्यांग मुलांच्या शिक्षणाची प्रगती सुकर व्हावी म्हणून अल्पारंभा फाऊंडेशनच्या माध्यमातून , त्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी तसेच दैनंदिन जीवन सुरळीत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासाठी, निधी उभा करण्याचे कार्य सुरु आहे.
विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषयाची रुची निर्माण व्हावी, मेंदूला चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांमधील कल्पकता वृद्धिंगत व्हावी या हेतूने नाशिकचे सुप्रसिद्ध गणितज्ञ् कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सुरु आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विविध कौश्यले निपजावीत यासाठी अल्पारंभ ऑनलाइन एज्युकेशन पोर्टलद्वारे विविध विषयांवरील ऑनलाईन कोर्सेस /अभ्यासक्रमाची उपलब्धता करून देण्याचे काम सुरु आहे. भेट द्या अल्पारंभ ऑनलाइन एज्युकेशन पोर्टल.
आमच्या विविध समाजोपयोगी कार्यास हातभार लागावा यासाठी विविध विषयांतर्गत ट्रेनिंग अर्थात प्रशिक्षण सत्रे घेण्याचे काम सुरु आहे. अधिक माहिती : ट्रेनिंग अर्थात प्रशिक्षण सत्रे.
यासाठी आम्ही विविध विद्यालये / महाविद्यालये यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) करत आहे.अधिक माहितीसाठी संपर्क: alparambha@gmail.com / डॉ. रुपाली कुलकर्णी 9011896681
आपणही या कार्यात योगदान देऊ इच्छित असल्यास संपर्क साधावा : alparambha@gmail.com, 9011896681