ll केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे ll

* संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे Click Here to Donate !   *अल्पारंभा ऑनलाईन लर्निंग कोर्सेस Click Here   *अल्पारंभा ट्रेनिंग/ प्रशिक्षण प्रोग्रॅम्स Click Here

शैक्षणिक उपक्रम

नमस्कार !

खूप कमी भारतीयांना आणि त्यातल्या त्यात नाशिककरांना माहित असेल की कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. नाशिक ही त्यांची कर्मभूमी !!

नाशिकजवळील देवळालीमधील एका शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. कै. द. रा. कापरेकर यांचे संशोधन मुख्यतः अंकशास्त्रावर आधारित होते. त्यांच्या संशोधनातील मुख्य योगदान म्हणजे कापरेकर संख्या, स्वयंभू संख्या, हर्षद संख्या, दत्तात्रेय संख्या, डेम्लो संख्या इ. शालेय स्तरावर कार्यरत असतांना देखील या स्तरावर त्यांनी ज्या दर्जाचे संशोधन केलेले आहे ही अत्यंत दुर्मिळपणे आढळणारी बाब आहे. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले प्रतिष्ठित समजले जाणारे रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते.

१९७५ साली प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकर सरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि Scientific American या मासिकात त्यांच्या कार्यावर आधारित लेख प्रकाशित केला. त्यामुळे कापरेकर सर भारतात आणि जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांचे नाव World Dictionary of Mathematics मध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, लेखक स्टेफानू एलियास अलॉइसियस यांनी ‘D.R. Kaprekar’ हे त्यांचे चरित्र लिहिले आहे.

बघा .. म्हणजे परदेशातील जनतेस ठाऊक असलेल्या या ज्ञानी भारतीय गणितज्ञाविषयी आपण भारतीयांनाच किती ठाऊक आहे ? अल्पारंभ फाऊंडेशनने हीच खंत बाळगली आहे. या थोर गणितज्ञाचे योगदान आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अल्पारंभ फाउंडेशनतर्फे 'कापरेकर कॉर्नर'' या प्रकल्पा अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. नाशिकमधील अनेक शाळा, महाविद्यालये येथे फाउंडेशनतच्या माध्यमातून कापरेकरांच्या संशोधनाचा प्रचार आणि प्रसार सुरु आहे. या स्वरूपाच्या कार्याच्या माध्यमातून कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्या स्मृतीस आणि कार्यास वंदन करणायचा आमचा हा लहानसा प्रयत्न आहे.

अधिक माहिती : श्री. रघुवीर अधिकारी. 98220 00883, टीम, अल्पारंभ फाउंडेशन

या संदर्भातील लेख / उपक्रमाच्या लिंक्स :


>