वैयक्तिक अथवा गट स्वरूपातील असंघटीत समाजोपयोगी कार्याला अधिक संघटितरित्या आणि परिणामकारक स्वरूपात पुढे न्यावे हा विचार करून, समविचारी सहकारी व मित्रपरीवाराच्या प्रेरणेने २०१८ साली अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन’ चा उदय झाला.
संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली. या दोन्ही विषयांच्या कक्षेत कार्य करतांना, त्यातील विविध निकडी ओळखून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्या निगडीत उपक्रम राबवणे हे अप्लारंभचे प्राथमिक उद्दिष्ट्य आहे.
शैक्षणिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे
सांस्कृतिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे
'आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार' यासाठी उपक्रम राबविणे
१) कर्णबधीर विद्यार्थ्यांना, शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात आणणारी संस्था : श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय , नासिक
२) विशेष मुलींच्या प्रगतीसाठी समर्पित संस्था : घरकुल परिवार संस्था
३) अंध बंधू-भगिनींच्या विकासासाठी कार्यरत : नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड्स अर्थात NAB, सातपूर
४) तसेच विवेकानंद केंद्र आश्रमशाळा पिंपळद, वयोवृद्ध रुग्णांना आपलेसे करणारी संस्था : दिलासा, ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण, जीवनस्तर मिळावा यासाठी समर्पित संस्था:पूर्वांचल सेवा समिती, समतोल जीवशैलीसाठी ध्यान साधना पुरस्कृत करणारे नासिक विपश्यना केंद्र आदी अनेक संस्थांचा उल्लेख करता येईल.
'गणित: कापरेकर कॉर्नर', सायबर सुरक्षा, मराठी भाषा सवंर्धन इ. क्षेत्रातही फाऊंडनेशनमार्फत उपक्रम चालू असतात.
(अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)
सांस्कृतिक क्षेत्र :सांस्कृतिक क्षेत्रामध्येही फाउंडेशनद्वारे विविध उपक्रम घेतले जातात. यामध्ये नासिक तसेच देशभरातील संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना, त्यांच्या कला प्रस्तुतीसाठी मंच उपलब्ध करून देणे, संगीत कलेच्या प्रसारासाठी अनेक ख्यातीवंत, नामांकित कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)
अर्थ साक्षरता अभियान:फौंडेशनच्या कार्याचा अजून एक आयाम म्हणजे "अर्थ साक्षरता अभियान"!
देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३% आहे. ही देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडसर ठरणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच सामाजिक अर्थ साक्षरता वृद्धिंगत व्हावी, यासाठी अल्पारंभा द्वारे सतत विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये "अर्थ साक्षरता क्लब" ची स्थापना करणे, आर्थिक साक्षरता विषयावर मार्गदर्शनपर सत्रे, उपक्रम घेणे, ब्लू बूक, मनोमनी,गवाक्ष आदी साहित्य निर्मिती आणि प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
(अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)
संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे !
शैक्षणिक क्षेत्र:श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय , नासिक येथील मूकबधीर विद्यार्थ्यंच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी श्रवणयंत्रांची आवश्यकता आहे,. त्यासाठी निधी उभारण्याचे काम सुरु आहे. तसेच 'गणित: कापरेकर कॉर्नर', सायबर सुरक्षा याविषयी विविध उपक्रम सुरु आहेत.
सांस्कृतिक क्षेत्र:संगीत कलेच्या प्रसारासाठी अनेक ख्यातीवंत, नामांकीत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करणे तसेच संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना मंच उपलब्ध करून देणे यासाठी उपक्रम हाती घेतले जात आहेत.
आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार: नासिक शहर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये, "आर्थिक साक्षरता क्लब / परिसंवाद " यांचे आयोजन करणे आणि त्याद्वारे तेथील विद्यार्थी / अधिकारी / कामगार वर्गाचे याविषया अंतर्गत प्रबोधन करणे हे काम सुरु आहे.